तरुण वर्गाने शिक्षणासोबत व्यायामाकडे वळावे व्यायामशाळेमुळे संस्कृती व प्रकृती दोन्ही गोष्टी साध्य होतात. शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये तरुणपिढी ने राष्ट्राचे नाव उज्वल करण्यासाठी प्रयत्नशील रहावे. विविध खेळाच्या माध्यमातून शासकीय नोकरी मध्ये संधी निर्माण झाल्या आहेत. असे मत भारत श्री बिभीषण पाटील शिवछत्रपती पुरस्कार विजेते यांनी व्यक्त केले ते इनसाईड ड्रीम , तिसंगी (ता. गगनबावडा) या व्यायामशाळा उदघाटन प्रसंगी बोलत होते.
मनगट चांगले असले तर मन शुद्ध बनते पर्यायाने जीवन समृद्ध बनते तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी. व्यायामामुळे प्रकृती ठणठणीत राहते असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी केले. उदघाटन प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील ( तात्या ), जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पी जी शिंदे, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील,पंचायत समिती गगनबावडा उपसभापती पांडुरंग भोसले, इनसाईड ड्रीम चे संस्थापक मधुकर पोतदार, विनायक पोतदार, ऑलिंपिया हेल्थ क्लब चे संस्थापक राजू कवाळे, वसंत कवाळे, अँड. दत्ताजी कवाळे, आर, डी वाघरे, बापू वाघरे, पांडुरंग खाडे, रवींद्र सातपुते, महेश पाटील, विनायक पाटील, सागर पाटील, बाबासो भोसले, आनंदा पाटील, राम सोनार यासह कार्यकर्ते व युवावर्ग उपस्थित होता.
0 Comments