कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मनोहर दिवटे यांनी केले.
यावेळी कु.ज्योतिका कांबळे,सौ.सोनाली कांबळे,सौ.अन्नपुर्णा कांबळे यांनी रमाईंच्या जीवनावर प्रकाश टाकत बाबासाहेबांच्या जीवनात असणारं रमाईंचं महत्त्वं आणि त्यांना करावा लागलेला त्याग यावर विवेचन केले.
तसेच पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला मिळणारी हीन वागणूक आणि त्यामुळे तीची होणारी कुचंबणा,तसेच त्यामुळे तीच्या प्रगतीतनिर्माण होणारे अडथळे यावर आपले मत व्यक्त केले.
संधी मिळाल्यास पुरुषाच्या बरोबरीने स्त्री सुद्धा चालू शकते असं त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोल कांबळे हे होते.
याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे अभिजित कांबळे,चंदगड तालुक्यातील नवोदित कवी,लेखक आणि पत्रकार रजनी कांबळे यांनी स्त्रीचं पुरुषाच्या जीवनात असणारं महत्तवं अधोरेखित करत,सध्य परिस्थितीवर भाष्य केले.
रजनी कांबळे यांनी वाचनाचे महत्त्व सांगत भविष्यात तालुका पातळीवर वाचन चळवळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत असं अवाहन उपस्थितांना केले.
विक्रम कांबळे या विद्यार्थ्याने रमाईंच्या जीवनावर कविता सादर केली.
यावेळी रवी कांबळे(दाटे),प्रभू कांबळे(बसर्गे),अनंत कांबळे(कोरज),अंकूश कांबळे(करंजगाव),संतोष कांबळे,विजय कांबळे,दशरथ कांबळे,श्रावण कांबळे,आदित्य कांबळे,सचिन कांबळे,राजेंद्र कांबळे,तसेच चंदगड तालुका चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.ए.डि.कांबळे यांनी केले. रजनी कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 Comments