आदिनाथच्या कामगारांच्या पगारीचा प्रश्न अंतिम टप्प्यात ; आता कोणत्याही पक्षाने व संघटनेने त्याचे राजकिय भांडवल करू नये


 करमाळा /प्रतिनिधी:

श्री.आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या पगारीचा प्रश्न न्यायप्रविष्ट बाब असल्याने अंतिम टप्प्यात आलेला असल्याने यामध्ये कोणत्याही पक्षाने संघटनेने किंवा गटाने राजकीय भांडवल करू नये, असे आवाहन महादेव म्हस्के यांनी केले आहे.

कामगारांचा नेता म्हणून फक्त दशरथआण्णा कांबळे यांनी वेळोवेळी आवाज उठवून प्रशासनाला जागे केले म्हणूनच आम्ही लढु शकलो असे सर्व कामगारानी आपल्या व्यता मांडल्या म्हणून सर्व कामगारांच्या वतीने सर्वाना विनंती करतो यामध्ये आता कोणत्याही पक्षाने हस्तक्षेप करू नये आतापर्यंत ज्या पक्षानी संघटनेनी गटांनी सहकार्य केले त्यांचे आम्ही आभारी आहोत.


आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेलगाव भाळवणी येथील ७०० कामगारांच्या६२ महिने थकित पगार संदर्भात कामगारांनी मागील दोन वर्षापासून सनदशीर मार्गाने कायदेशीर अशी आंदोलने कामगारांनी इंटकचे अध्यक्ष नानासाहेब साखरे व शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने केली.

येथून ही पुढे गरज पडल्यास श्री नानासाहेब साखरे व दशरथ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुढील आंदोलने केली जातील .कामगारांच्या थकीत पगार संदर्भातील लढाई अंतिम टप्प्यात आली आहे, आदिनाथ कामगारांचे थकीत पगार ही आता न्यायप्रविष्ट बाब आहे.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना बँकेमार्फत भाडेतत्त्वावर दिलेला आहे हे जगजाहीर आहे तरी भाडेतत्त्वावर आदिनाथ कारखाना हा आमदार रोहित (दादा)पवार यांच्या संस्थेला दिलेला आहे असे आम्हा सर्व कामगारांना समजते, तसेच देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर सर्व कामगारांचा विश्वास आहे.

पवार साहेब हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचार मानणारे सर्वसमावेशक नेतृत्व आहे पवार साहेब शेतकऱ्यांचे जाणते राजे आहेत कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ आहेत.


 

Post a Comment

0 Comments