बार्शी/प्रतिनिधी:
अच्छे दिना चे स्वप्न दाखवत ५० पैसे पेट्रोल भाव वाढ झाली म्हणून देशात आंदोलन करून आम्ही सत्तेवर आल्यास पेट्रोल व गॅसचे भाव सर्वसामान्य जनतेला परवडतील असे सांगून अच्छे दिन येणार महागाई कमी होणार १५ लाख देणार २ कोटी रोजगार देणार म्हणून लोकांच्या भावनेशी खेळत सत्ता आल्यानंतर गेली सात वर्षे जनतेच्या पाठीत रोजगार, महागाई पेट्रोल भाववाढ गॅस दर भाववाढ, याचा खंजीर खुपसून हम दो हमारे दो म्हणत उद्योग धार्जिन बड्या उद्योगपती साठी निर्णय घेणाऱ्या व सर्वसामान्य जनतेला व शेतकऱ्याला आर्थिक संकटात व देशोधडीला लावणार्या भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे तसेच प्रदेश सरचिटणीस सुमित भोसले प्रदेश सरचिटणीस तथा सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक विनोद भोसले बार्शी शहराध्यक्ष ऍड.जीवनदत्त आरगडे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली बार्शी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.
भाजप सरकार आल्यापासून गेली अनेक वर्ष अच्छे दिन कुणालाच दिसले नाही अच्छे दिनाचा अनुभव कोणीही घेतला नाही. गॅस पेट्रोल दरवाढीचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. पेट्रोल गॅस व डिझेल चे भाव बीजेपी सरकारने नियंत्रित नाही केल्यास युवक काँग्रेस आणखी तीव्र आंदोलन आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला. तसेच पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल टाकण्यास आलेल्या नागरिकांनाचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल मस्के शहराध्यक्ष संतोष शेट्टी सोलापूर जिल्हा सरचिटणीस दत्ताजी गाढवे बार्शी तालुका कार्यध्यक्ष तानाजी जगदाळे महिला काँग्रेसच्या ऍड.निवेदिता आरगडे सेवादल यंग ब्रिगेड जिल्हाध्यक्ष डॉ.विजय साळुंके शहर उपाध्यक्ष निलेश मांजरे पाटील विध्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष केशव मुकटे, ओमप्रसाद अनपट,बबलू शेट्टी,शिवा माने,सोनू नवगण,अमोल नवगण,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments