"भारत देश धर्मनिरपेक्ष,एकसंघ, आर्थिक- सामाजिक व राजकीयदृष्ट्या सामर्थ्यशाली बनविण्यासाठी गांधी आचार -विचारांची गरज: संकेत मुनोत"

प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

महात्मा गांधी विचार प्रचार समिती,  कुरुंदवाड यांचे वतीने गांधी विचार कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास विविध शाळा कॉलेजचे विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित राहून त्यांना महात्मा गांधी यांच्या  एकूण  कार्याची व वैचारिक मार्गदर्शनाची शिदोरी या मेळाव्याच्या निमित्ताने मिळाली.
            
कुरुंदवाड शहराजवळील कृष्णा पंचगंगा नदीच्या पवित्र संगम घाटावर दिनांक १२ फेब्रुवारी १९४८ रोजी महात्मा गांधींच्या पवित्र अस्थीचे विसर्जन करण्यात आले होते.त्या दिवसापासून आजपर्यंत गेली ७२ वर्ष १२ फेब्रुवारी हा दिवस या परिसरातील सर्व जिल्ह्यांच्या गांधीवादी कार्यकर्त्यांसाठी, स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदय सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी सर्वोदय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने कुरुंदवाड ता.शिरोळ येथे गांधीवादी विचारांची सर्व पातळीवर चर्चा करण्यात आली.
       
या कार्यकर्ता मेळावाच्या निमित्ताने गांधीवादी कार्यकर्ते व शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्याकडून साफसफाई करण्यात आली त्यानंतर महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यकर्ता मेळावा सुरुवात झाली.  रघुपती राघव राजाराम या प्रार्थनेने सुरवात झाली.प्रारंभी या समितीचे अध्यक्ष अल्लाउद्दीन दानवाडे गुरुजी यांनी उपस्थित असणाऱ्या मान्यवर व विद्यार्थी यांचे स्वागत करून या मेळाव्याच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट करताना ते म्हणाले की,या जगाचा उद्धारकर्ता व अखंड मानवजातीला माणूसपण देणारा  गांधी या असामान्य कर्तुत्ववान महात्म्याने जगाला एक दिशा दिली.या महात्मा नावाच्या व्यक्तीचा समग्र अभ्यास व वैचारिक मंथन व्हावे ही अपेक्षा या निमित्ताने आहे.
         
उपस्थित मान्यवर व गांधीवादी विचारवंत  यांचा परिचय राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ यांनी करून मेळाव्यातील विद्यार्थ्यांची स्फूर्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला. 
        
डॉ.आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था सांगोलाचे संस्थापक मा. ललित बाबर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले की चरखा हे अहिंसेचा प्रतीक असून रचनात्मक कार्याचा एक भाग आहे. त्याचबरोबर जात,धर्म,पंथ व प्रदेश भेद यासारख्या विभागणीला आव्हान देण्याचं काम आजच्या काळात फक्त गांधींची प्रेरणा व समग्र कार्यच करू शकतो. यानंतर मान्यवरांच्या हस्ते 'धैर्यशील योद्धा' या पुस्तकाच्या  तिसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
       
 या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे व गांधी विचार अभ्यासक,पुणे मा. संकेत मुनोत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला पूर्वी 'एक रुपया चांदीचा सारा देश गांधीचा'या घोषणेने नंतर विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. सुरुवातीस महात्मा गांधीजी यांच्या विरोधात काम करायला सुरुवात केली नथुराम गोडसे सावरकर हे  यासारख्या व्यक्ती सुरुवातीच्या आकर्षणाचे मुख्य बिंदू होते. मात्र देशातील मोठमोठे विचारवंत लेखक मान्यवर मंडळी प्रसिद्ध व्यक्ती यांच्या सर्व कामात महात्मा गांधी दिसू लागले त्यामुळे मनात गांधींच्या विषयी कुतूहल निर्माण झाले मात्र महात्मा गांधींचे आत्मचरित्र वाचल्यानंतर माझ्या विचारांचा एकदम यू-टर्न झाला आणि खऱ्या अर्थाने मी विचाराने,मनाने सर्व पातळीवर गांधी झालो. गांधी नावाचा ही व्यक्ती म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर ६०० पेक्षा अधिक विद्यापीठात गांधी जयंतीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात केला जातो प्रति वर्षी सरासरी ६० पुस्तिकेचं लिखाण केलं जातं त्याच बरोबर नेपोलीन व महात्मा गांधी यांच्यावर २ लाखापेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. असा हा असामान्य, साधी राहणी व उच्च विचारसरणी जोपासणाऱ्या माणूस होय. महात्मा गांधीच्या विचाराने प्रेरित होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर असंख्य देशात ब्रिटिशांचं स्थान व अस्तित्व हळूहळू कमी होऊ लागले. हे त्यांच्या आचार विचारांचे उत्तम द्योतक आह अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केले. भारतातील हिंदू  कट्टरवादी व पाकिस्तानातील मुस्लीम कट्टरवादी  यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेत महात्मा गांधी विचार अडसर ठरू लागला. त्यामुळे त्यांच्याविषयी द्वेष व प्राणघातक हल्ले होऊ लागले.  भारत हा  देश धर्मनिरपेक्ष,एकसंघ, आर्थिक- सामाजिक व राजकीयदृष्ट्या  सामर्थ्यशाली बनविण्यासाठी गांधी आचार -विचारांची गरज आहे असे परखड मत त्यांनी मांडले. या मेळावा चे वैशिष्ट्य म्हणजे आयोजकांनी संकेत मुनोत हे अत्यंत तरुण व गांधी विचार अभ्यासक असल्यामुळे त्यांनी महात्मा गांधी विचारांच्या  माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा एक यशस्वी प्रयोग करण्यात आला व त्यामध्ये ते यशस्वी झाले. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींची संबंधित असंख्य प्रश्न विचारून त्याचे समाधानकारक उत्तर मा.मुनोत यांनी दिले आणि गांधी संवादाचे रुपांतर सुसंवाद मध्ये झाले .

या सत्राचे अध्यक्ष गांधीवादी विचारवंत माननीय संजीव साने यांनी महात्मा गांधीजींच्या असंख्य विचार प्रवाहाची मांडणी करून या मेळाव्याला वैचारिक गांधीवादी सक्षमता आणली. त्यामुळे उपस्थित विद्यार्थी भारावून गेले होते. या प्रथम सत्राचे आभार प्रा.डी.वाय. चव्हाण यांनी मांडले.
        
 त्यानंतर सुरुवातीस शाहीर बाळासाहेब नाईक यांनी गांधीजींच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. राष्ट्र सेवा दलाचे बाबासाहेब नदाफ व त्यांची टीम यांनी सांस्कृतिक गीत मंच कार्यक्रम  प्रसिद्ध संगीतकार  विजय सुवासे यांच्या उत्तम साथीने मंत्रमुग्ध केला. इचलकरंजीच्या स्मिता पाटील  कला मंच यांनी महात्मा गांधीजी यांच्या कार्याविषयी गाणी सादर केली. या बहारदार गीत गायनाने उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांच्या मध्ये एक सकारात्मक संचार निर्माण करून 
 त्यांनी वाहवाह मिळविला.
    
 या मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रांमध्ये संतोष जुगळे,महेश घोटणे,लेखिका नीलमताई माणगावे, श्रेयांश पाटील व आदिती जुगळे या मान्यवरांनी महात्मा गांधींच्या विविध पैलूवर विद्यार्थ्यांची मनमुराद  संवाद साधला. विद्यार्थी या संवादाच्या माध्यमातून गांधी विचारांशी जोडले गेले. यानंतर माध्यमिक गट व महाविद्यालयीन गट या स्तरावर गांधी विषयाशी संबंधित वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेचा निकाल अनुक्रमे १) अमन पटेल एस.के.पाटील महाविद्यालय,कुरुंदवाड २) सिमरन बाबासाहेब नदाफ दत्त महाविद्यालय, कुरुंदवाड यांचे अनुक्रमे प्रथम क्रमांक प्राप्त केले असून या विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा व मेळावा या  बाबत आनंद व्यक्त केला. यानंतर ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने,सुंदर देसाई व लेखिका नीलमताई माणगावे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला
     कार्यक्रमाच्या समारोप अतिथि मार्गदर्शनामध्ये गांधी विचार अभ्यासक संकेत मुनोत यांनी गांधींच्या व्यक्तीमत्वाला स्पर्श करणारे असंख्य मुद्द्यावर चर्चा केली. या मेळाव्याचा समारोप राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्म प्रार्थना गायनाने समारोप संपन्न झाला.
       
या मेळाव्यास ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्राचार्य व्ही.डी. माने, सुंदर देसाई अध्यक्ष खादी ग्रामोद्योग संघ कोल्हापूर, श्रीमती गीताताई गुरव उपाध्यक्ष खादी ग्रामउद्योग संघ ,मेघना शेटे, अरुण चव्हाण वेरळा सोसायटी, एस. एस.सावंत,हसन देसाई ,आबा कांबळे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमास जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर राष्ट्रीय सेवा योजनेचे  स्वयंसेवक विद्यार्थी, दत्त कॉलेज कुरुंदवाड, एस.के.पाटील महाविद्यालय कुरुंदवाड, शेंडूरे कॉलेज हुपरी, एस.पी.कॉलेज कुरुंदवाड व साने गुरुजी हायस्कूल कुरुंदवाड यामधील प्राध्यापक,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये प्रा.डॉ. प्रभाकर माने,प्रा.राजू निर्मळे, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार दगडू माने व तुकाराम पवार यामध्ये सहभागी होते.
          
या कार्यक्रमाचा सुंदर व अत्यंत मधुर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन महेश घोटणे यांनी केले. या कार्यक्रमाच्या उत्तम आयोजनामध्ये  तरुण पाहुणा, विद्यार्थी आणि गांधीवादी विचार या माध्यमातून संवाद साधण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या मध्ये सर्व पातळीवर विविध विषयांची माहिती होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून अध्यक्ष अल्लाउद्दीन दानवाडे, उपाध्यक्ष तुकाराम चिटणीस नारायण कौलापुरे, बाबासाहेब नदाफ प्रा डी.वाय.चव्हाण, संतोष जुगळे,महेश घोटणे,दिपक पाटील,निखिल आलासे, श्रीकांत चव्हाण,नितीन खांडेकर, माजी नगरसेवक वैभव उगळे व ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते बंडा परीट व दानवाडे साहेब यांचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर एफ.वाय.कुंभोजकर, ॲड. संभाजी जाधव व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments