म्हशीवर करणी केल्याचा राग मनात धरुन सहा वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. बीडमध्ये झालेल्या चिमुकल्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे काही दिवसांपूर्वी एकच खळबळ उडाली होती. हत्येप्रकरणी चिमुरड्याच्या भावकीतील दाम्पत्यालाच अटक करण्यात आली आहे. शुभम उर्फ राज सपकाळ हा बालक मृत बालकचे नाव आहे.
शुभम बहिणीसोबत जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात खेळण्यासाठी गेला होता. शाळेच्या जवळच आरोपी राहत असल्याने त्यांनी शुभमला घरी नेले आणि त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह गोणीत घालून शाळेजवळ फेकला.
६ वर्षीय शुभमच्या संशयास्पद मृत्यूने बीडमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. ही घटना नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रत्नागिरी या गावात ही घटना घडली होती.
0 Comments