पंढरपूर/प्रतिनिधी:
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात पंढरपूर कराड या महामार्गावर फूट रस्ता वर गतिरोधक करावी, या मागणीसाठी कोर्टी ग्रामस्थांकडून सुमारे एक तास रास्ता रोको करण्यात आला. बांधकाम विभागाच्या कारभाराविषयी ग्रामस्थांनी यावेळी जोरदार घोषणा दिली आमदार पडळकर विचार मंच जिल्हाध्यक्ष संजय माने यांचे नेतृत्वाखाली आंदोलन केले.
पंढरपूर कराड या महामार्गावर अपघातामध्ये ६ जणांचा बळी
पंढरपूर कराड या महामार्गाचे काम अनेक वर्षापासून सुरु आहे व या मार्गाची नूतनीकरणाचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे, मात्र वाहनांची वजन जास्त प्रमाणात असल्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे, रस्ता चांगला झाला असल्यामुळे वाहने बेफान वेगाने जात असतात त्यामुळे येथे गतिरोधक नसल्यामुळे आतापर्यंत २० अपघात झाल्याची नोंद आहे तर त्यामध्ये सहा जणांचा बळी गेला आहे त्यामुळे लवकरात लवकर गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.
ग्रामस्थांकडून बांधकाम विभागाला निवेदन
गेल्याने वर्षापासून पंढरपूर कराड या महामार्गाची काम सुरू आहे या मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे, काही दिवसापूर्वी संग्राम वाघमोडे या शाळकरी मुलाला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरात धडक दिली होती. त्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला होता त्यावेळीही ग्रामस्थांकडून जिल्हाधिकारी पासून ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते मात्र या निवेदनाची कोणतीही दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी कुठे रस्ता येथे सकाळी आंदोलन केले पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
0 Comments