परळीची राहवाशी असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड याचे नाव भाजपाकडून घेतले जात आहे, यासाठी पुरावा म्हणून देण्यात येत असलेला ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे. पूजाच्या आत्महत्येसंदर्भात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल क्लिपवरून भाजपने ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आता मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पूजा चव्हाणची हत्या नाही, तर पूर्णपणे आत्महत्याच आहे. तसेच या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहे. पण या आत्महत्याप्रकरणी चौकशी देखील सुरु आहे. त्यामुळे चौकशीनंतर यावर अधिक बोलता येईल, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.
0 Comments