सरपंचपदाची शपथ घेण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर घेऊन गावात



संगमनेर तालुक्यातील आंबीदुमाला येथील नवनिर्वाचित सरपंच जालिंदर गागरे यांनी आज अनोख्या पद्धतीने सरपंच पदाची सुत्रे हाती घेतली. थेट पुणे ते आंबीदुमाला येथे हेलिकॉप्टरने येऊन सरपंचपदाची शपथ घेतली आहे. 

 योगायोगाने सरपंचपद सर्वसाधारण पुरूषाचे निघाल्याने जालिंदर गागरे आज सर्वानुमते सरपंचपदी विराजमान झाले आहेत. गावचा विकास हेच ध्येय असल्याचं जालींदर गागरे यांना यावेळी सांगितले आहे. गावाकडे चला हा नारा गांधीजींनी दिला होता त्याच ध्येयाने मी गावात आलो असून आजचा सोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी हेलिकॉप्टरने आलो असल्याचं जालींदर गागरे यांनी सांगितले आहे. गावचा विकास करण्याचा ध्यास असलेला सरपंच लाभल्याने आज गावही आनंदी आहे. अशाच पद्धतीने राज्यातील प्रत्येक गावातील सुशिक्षित उद्योजक जर पुढे आले तर गाव सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना उपस्थित गावकऱ्यांनी व्यक्त केली.

(Advertise)

संगमनेर तालुक्यातील पठारभागातील आंबीदुमालाचे नवनिर्वाचित सरपंच तथा युवा उद्योजक जालिंदर गागरे यांनी गावच्या विकासाचा संकल्प हाती घेतला असून त्यांना गावकर्‍यांनी देखील साथ दिली आहे. याच बळावर गावाला जगाच्या नकाशावर झळकविण्याचा ध्यास घेऊन वाटचाल करण्यापूर्वीच सरपंच गागरे हे पुणे येथून आज आंबीदुमाला येथे हेलिकॉप्टरने येत सरपंच पदभार स्वीकारला आहेत. याच बरोबर ग्रामदैवत रोकडेश्वर, अकलापूर देवस्थान, बाळेश्वर देवस्थान व सावरगाव घुले येथील खंडोबा देवस्थानवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली आहे. या सुखद धक्क्याची जय्यत तयारी गावकऱ्यांकडून करण्यात आली होती. सरपंच जालिंदर गागरे यांची हेलिकॉप्टर मधून निवड उपीट कापायला तर काढायला गेले एन्ट्री होताचा फटाक्यांचा जल्लोषात गावकऱ्यांनी स्वागत करत सरपंच आणि उपसरपंच यांची बैलगाडीतून जंगी मिरवणूक गावातून ढोल ताशाचा गजरात काढण्यात आली.

Post a Comment

0 Comments