१६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सूरतमध्ये घडली आहे. मुलीच्या घरातील कुणालाही या आत्महत्येचं नेमकं कारण माहिती नव्हतं. मात्र रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत मुलगी ही दोन महिन्यांची गर्भवती होती अशी माहिती तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून उघड झाली आहे.
या प्रकरणाचा तपास आत्महत्या समजून करत होतो, मात्र आता पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत मुलीचे कोणी लैंगिक शोषण केले होते का? या प्रकरणाचाही तपास करणार आहोत, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
0 Comments