बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी नगरपरिषदेच्या वतीने बार्शी शहरातील देशमुख प्लॉट, गाडेगांव रोड येथे १६ लाख ५० हजार रुपये किंमतीचे, नाथपंथी डवरी गोसावी समाज सभागृहाचे भूमिपूजन आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील , भारत पवार , गटनेते दिपक राऊत, नगरसेवक कय्युम पटेल, काकासाहेब फुरडे, भैय्या बारंगुळे, ॲड. महेश जगताप, रोहित लाकाळ, नाथपंथी समाजाचे संजय चव्हाण, काशीनाथ गोसावी, एकनाथ हिंगमिरे,विद्याभूषण नारवे, शिवाजी कासार, किशोर साळी, मच्छिंद्र प्रबळकर व बंधू-भगिनीं उपस्थित होते.
0 Comments