स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या चिखली रोडवरिल कार्यालयावर सशस्त्र हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. रविकांत तुपकर आपल्या कार्यकर्त्यांसह कार्यालयात बसले असताना त्यांच्याच सावळा गावातील जनार्धन गाडेकर नामक इसमाने हातात कुर्हाड घेऊन तुपकर यांच्या कार्यालयावर येऊन हल्ला केलाय.
यावेळी तुपकर यांच्यावर वार करण्यापूर्वी त्यांचे अंगरक्षक आणि स्वीय सहाय्यक मधात आल्याने अनर्थ टळलाय.पण झटापटीत तुपकर यांच्या स्वीय सहाय्यकाला छातीत जबर मार लागलाय. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशन बुलढाणा येथे तक्रार दाखल केलीय.आरोपी जनार्धन गाडेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेय.
0 Comments