महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील ‘शिक्षण सेवक’ पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले कोरोनामुळे राहिलेल्या पदभरती बंदीतून ‘शिक्षण सेवक’ पदभरती प्रक्रिया वगळ्यात आली आहे.
त्यांनी सांगितले ‘उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार पवित्र पोर्टलदवारे उर्वरीत सुमारे ६ हजार पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होत आहे.असे ही शिक्षणमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितले आहे
0 Comments