राजस्थानमधील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसला एकूण ६२० प्रभागांमध्ये विजय मिळाला आहे. तर भाजपा तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. भाजपाला ५४८ प्रभागांत विजय मिळाला.
मतमोजणीत एकूण १७७५ प्रभागांच्या मतमोजणीत काँग्रेसला ६२० तर भाजपाला ५४८ ठिकाणी विजय मिळाला. बसपाला ७, सीपीआयला २, सीपीआय (एम), आरएलपीचा एक आणि ५९५ अपक्षांना विजय मिळाला.
दरम्यान. या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये गहलोत म्हणाले की, नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा. काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून काँग्रेसला विजयी केल्याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार मानतो.
0 Comments