हिंमत असेल तर एकटे एकटे लढा असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीला दिले. भाजपाला निवडून द्यायच नाही हा एकच महाविकास आघाडीचा अजेंडा असल्याचे पाटील म्हणाले. पदवीधर मतदार संघाच्या झालेल्या निवडणुकीत पराभव मिळाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मित्र त्यांना जाऊन मिळाला म्हणून हे चित्र पाहायला मिळालं असे म्हणतं त्यांनी शिवसेनेचा उल्लेख केला. शिवसेना सोबत असती तर बळ मिळालच असतं पण ते सोबत नाहीत. त्यांनी आता रंग बदलला आहे. ते सध्या राष्ट्रवादीसोबत आहेत असे ते म्हणाले. तसेच शिवसेनेला या निवडणुकीत अक्षरक्ष भोपळा मिळाला. मुख्यमंत्री असून त्यांना उमेदवार निवडतां येत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
मी विनोदी विधान करतो अस शरद पवार बोलतात त्यांना बोलू द्या.शक्यतो ते खालच्या पातळीची वक्तव्य कधीही करत नाही असे पाटील म्हणाले.
0 Comments