‘कंगणा राणावत म्हणजे हिमाचलाचं सडलेलं सफरचंद'


अभिनेत्री कंगणा राणावतेने या आंदोलनाला विरोध करणारे एक ट्विट केले होतं. याचवरून काँग्रेसच्या खासदाराने कंगणावर टीका केलीये.

(Advertise)

पंजाबच्या लुधियानामधील काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी ट्विट करत कंगणावर टीका केलीये. या ट्विटमध्ये त्यांनी कंगणा राणावतला हिमाचलंच सडलेलं सफरचंद म्हटलंय.

(Advertise)

खासदार रवनीत सिंह बिट्टू म्हणाले, “मी कंगणाला सांगू इच्छितो की पंजाबच्या लोकांच्या समस्यांमध्ये आम्ही बाहेरील लोकांना घुसू देत नाही. हिमाचलच्या सडलेल्या सफरचंदाने दूर रहावं.”

रवनीत सिंह बिट्टू यांच्या ट्विटला कंगणा काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Post a Comment

0 Comments