हाजापूर येथील शेतकऱ्याचा ओढ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू



मंगळवेढा/प्रतिनिधी :
 
तालुक्यातील हाजापुर येथील नवनाथ किसन लुगडे (वय.२८) या तरुण शेतकऱ्याचा ओढ्याच्या पाण्यात पडून मृत्यू झाला आहे.ही घटना आज सकाळी ७ च्या सुमारास हाजापुर येथील ओढयात घडली आहे.

(Advertise)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत नवनाथ लुगडे हा त्याच्या शेतात दारे धरून येत होता. शेता जवळ असलेल्या ओढया मध्ये येताच त्याला अचानक फिट/चक्कर आल्याने तो बेशुद्ध होऊन ओढयात पडला.

ओढयात पाण्याची पातळी जास्त असल्याने तो बेशुद्ध अवस्थेत पाण्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
मयत नवनाथ लुगडे हा शेती बरोबर एका खाजगी साखर कारखान्यात शिपाई या पदावर काम करत होता. त्याच्या मृत्यूनंतर हाजापूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments