रशियात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात

 

कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. जगभरात लाखो लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. अशातच संपूर्ण जगाचं लक्ष लागले आहे, ते कोरोनावरील प्रभावी लसीकडे. जगभरातील अनेक देश कोरोनावरील प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 


(Advertise)

 अशातच अनेक लसींची चाचणी ही अंतिम टप्प्यात आहे. रशियाने मात्र सर्वात आधी कोरोनावरील प्रभावी लस 'Sputnik V' तयार केल्याचा दावा केला होता. आता रशियाने लसीकरणालाही सुरुवात केली आहे. कोरोना लसीच्या लसीकरणात रशियाने आघाडी घेतली आहे. रशियामध्ये प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

(Advertise)

 'Sputnik V' या रशिया निर्मीत कोरोना लसीचा डोस रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये देण्यात येत आहे.  डॉक्टर, आरोग्यसेवक अशा हायरिस्क वर्गात मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य दिलं जात आहे.
लसीकरणासाठी मॉस्कोमध्ये शनिवारी ७० लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

Post a Comment

0 Comments