राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुंबई लोकलमधून प्रवास करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.या प्रवासादरम्यानचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी मुंबईत असताना अनेकदा लोकलने प्रवास व्हायचा, असं म्हणत रोहित पवार जुन्या आठवणींमध्ये रमले. करोनाच्या संकटावर मात करत मुंबईची लाईफलाईन पूर्ववत होईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आमदार म्हणून निवड झाल्यानंतर रोहित पवार हे तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणं, पक्षाची बाजू मांडणं, कोणताही बडेजाव किंवा तामझाम न करता रोहित पवार यांनी केलेल्या लोकल प्रवासामुळे त्यांचं कौतुक होताना दिसत आहे.
0 Comments