We did it Joe! विजयानंतर कमला हॅरिस यांना आनंदाश्रू!


डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष बनणार आहेत. तर, त्यांच्याच पक्षाच्या कमला हॅरिस यांनी देखील उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे.

निवडणूकीत यश मिळाल्यानंतर कमला हॅरिस यांनी ही माहिती जो बायडन यांना फोन करून दिली. त्याप्रसंगी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. या क्षणाची एक व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी ”We did it Joe! तुम्ही अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष होणार आहात” असं जो बायडन यांना म्हटलं आहे.

भारतीय वंशाची व्यक्ती अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर त्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकी-अमेरिकी उपाध्यक्ष होत आहेत.

Post a Comment

0 Comments