"देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाहेरून आलेलं म्हणणं ही शोकांतिका"


राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कोरोना लसीबाबत कोणताही दावा करु नये. सुप्रिया सुळे संसदेच्या सदस्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाहेरून आलेलं म्हणणं ही शोकांतिका आहे, अशी टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

(Advertise)

मोदींनी काल पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन शास्त्रज्ञांशी कोरोना लसीबाबत चौकशी केली होती. मोदी यांच्या पुणे दौऱ्यावरुन सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. याला गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिलंय.

(Advertise)

लोकसभेच्या सदस्य असून अशा प्रकारचे बालिश वक्तव्य करणे चुकीचं आहे, असा टोला गोपीचंद पडळकरांनी लगावला आहे.

(Advertise)

सरकारला एक वर्ष पूर्ण झालं तरी कॉमन मिनिमम प्रोग्राम काय आहे हे देखील सांगता आलं नाही. सरकारने कोणतेही आश्वासन पूर्ण केलं नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शपथेचा भंग केला, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments