दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या एका २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर पीडित तरुणीला शिवीगाळ व मारहाण करत बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील पारोळा शहरात ही धक्कादायक घटना घडली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या घटनेची माहिती समोर आली आहे. त्यात टोळी गावातील रहिवासी असलेले संशयित आरोपी शिवानंद शालिक पवार, पप्पू अशोक पाटील आणि अशोक वालजी पाटील या तिघांनी पीडितेचे अपहरण करत तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा संशय आहे. यातील शिवानंद पवार हा पीडितेला मैत्री करण्यासाठी दबाव टाकत असे.
पीडितेने धुळे येथे उपचारासाठी नेत असताना नातेवाईकांना घटनेबाबत माहिती दिली. ७ नोव्हेंबर रोजी संशयित आरोपींनी पीडितेला काहीतरी गुंगीचे औषध देऊन तिचे पारोळा शहरातून अपहरण केले. त्यानंतर तिला एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे अज्ञातस्थळी नेऊन रात्रभर तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. पीडितेने प्रतिकार केला असता, तिघा नराधमांसह एका अनोळखी महिलेने पीडितेला शिवीगाळ करत बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत पीडितेच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या होत्या.
0 Comments