करमाळा/प्रतिनिधी:
जिंती (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी भोसले यांच्या घरी चोरी झाली आहे. देवघरात पुजेसाठी ठेवलेले सोन्या चांदीच्या दागिण्यासह इतिहासकालिन नानी व रोकडसह तीन लाखाची जबरी चोरी झाली आहे. राजेंच्या वाड्यात चोरी झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. फिर्याद शहाजीराजे उमाजी राजेभोसले यांनी करमाळा पोलिसांत दिली आहे.
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरणे, जनावरांच्या चोऱ्याचे प्रकार वाढले आहेत. जिंती गावात पोलिस औटपोस्ट असूनसुद्धा चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांचा चोरट्यांना धाक राहिलेला नाही, हे यावरून स्पष्ट होत आहे. या भागात मागील दोन महिन्यांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
जिंती गावात रविवारी पहाटे सव्वातीन वाजता चोरांनी राजेभोसले यांच्या वाड्यामध्ये चोरी केली. लक्ष्मी पूजनानिमित्त राजेभोसले यांनी देवघरात दागिने व पैशाचे पूजन केले होते. हे पूजन केलेले पैसे व दागिने चोरांनी पळवले आहेत. वाड्यामध्ये सीसीसीटीव्ही असल्यामुळे चोरट्यांचे सीसीटिव्ही फुटेज सापडले आहे. या फुटेजमध्ये सहा चोर दिसत आहेत.
त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. या चोरीच्या तपासासाठी सोलापूर येथून श्वानपथक मागविले होते. श्वानाने चोराचा माग काढला आहे.
शहाजी राजेभोसले म्हणाले, लक्ष्मी पूजनानिमित्त देवघरात दागिने व पैशांची पूजा केली होती. मी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी उठलो असता मला देवघराच्या खिडकीपाशी अनोळखी इसम दिसला. तो चोर होता. मी आवाज दिल्यावर चोर पळाले. एकूण सहाजण होते. असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला याबाबत करमाळा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला
0 Comments