आई माझी काळुबाई' या मालिकेतील वाद काही थांबायचं नाव घेत नाही. या मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री अलका कुबल यांनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यावर आरोप केलेत.
साताऱ्यात ‘माझी आई काळुबाई’ या मालिकेचे चित्रीकरण सध्या सुरु असून निर्मात्या अलका कुबल-आठल्ये आणि याच मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यामधील झालेला वाद चांगलाच चर्चेत आला. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने ही मालिका अर्ध्यातूनच सोडल्याचं समोर आलं. त्यानंतर अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच शाब्दिक चकमक झडली.
छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासनं अलका कुबल यांना दिलं. त्याचबरोबर प्राजक्ता गायकडवाड हिच्याशीही फोनवरून चर्चा करत वाद मिटवण्याचं सूचना केली. या भेटीची माहिती उदयनराजे यांनी ट्विट करून दिली.
0 Comments