“शाहू महाराजांनी २०० वर्षांपूर्वी आरक्षण दिलं! आज मराठा समाजाला का नाही?” - खासदार संभाजीराजे


शाहू महाराजांनी २०० वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिलं. केवळ मराठ्यांना दिलं नाही. त्यावेळच्या बहुजनांमध्ये मराठा समाजाचाही समावेश होता. मात्र, आज मराठा समाज प्रवाहाच्या बाहेर का?, असा सवाल खासदार संभाजीराजे यांनी सरकारला केलाय.असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते

अनेक नवे कार्यकर्ते तयार होतात मात्र त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी कसं काम केलं हे माहिती नसतं.शिवाजी महाराज देखील माझं स्वराज्य हे अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांचं असल्याचं सांगतात, असं संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

माझी मनापासून इच्छा आहे की लवकरात लवकर सर्वांनी जवळ यावं. लोकंच जवळ आली नाही तर येऊन उपयोग नाही. खांद्याला धक्काबुक्की झाल्याशिवाय छत्रपती घराण्याचं आणि मावळ्यांचं नातंच होऊ शकत नाही. समाज अडचणीत असताना त्याचे धक्केबुक्के खाल्ले पाहिजे. यातूनच प्रेम निर्माण होतं, असं संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

Post a Comment

0 Comments