“भाजपने राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही”


भाजपने राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही. त्यांनी देवालासुद्धा राजकारणाच्या आखाड्यात ओढलं, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केली. प्रत्येक गोष्टीत राजकारण हा भाजपचा स्थायीभाव आहे.
(Advertise)

भाजपच्या मनात देवाविषयी भक्तीभाव नाही. मात्र, राजकारणाच्या आखाड्यात देवाला ओढण्याचा प्रयत्न भाजप नेहमीच करत राहीला आहे, असं सावंत म्हणाले.
(Advertise)

राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं सुरु झाली आहेत. ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे काहींनी स्वागत केले. तर मुख्यमंत्र्यांना हे उशिराने सुचलेलं शहाणपण आहे, असं म्हणत विरोधकांनी सरकारवर टीका केली. याला सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
(Advertise)

राज्यात बार आणि रेस्टॉरंट सुरू होतात, मग मंदिरं उघडण्याचा निर्णय का नाही, असा सवालही विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. ह्या सर्व प्रकारावर त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.

Post a Comment

0 Comments