"मंगळवेढा! हुलजंती पालखी सोहळ्यात पोलिसांचा लाठीचार्ज


मंगळवेढा/प्रतिनिधी:

कोरोनाच्या काळात बंद असलेली मंदिरं अखेर ८ महिन्यानंतर उघडण्यात आली आहे. राज्यातील सर्वच देवस्थानांनी नियम अटींचे पालन करत मंदिरांची दार उघडली आहे. परंतु, मंगळवेढ्यात जमावबंदीचा आदेश तोडल्यामुळे यात्रेत पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे.
(Advertise)

मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रेदरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने जमाबंदीचा आदेश लागू केला होता. असं असतानाच त्याच पूर्व संध्येला तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रा काढण्यात आली होती.
(Advertise)

शेकडो लोकांच्या संख्येनं गावकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. पालखी सोहळा सुरू असताना पोलिसांनी गावकऱ्यांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. पण, गर्दी वाढतच चालली होती. त्यामुळे अखेर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पालख्यासोबतचे भाविक, यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह ७४ जणांवर गुन्हे दाखल केले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली.

Post a Comment

0 Comments