शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपनेते खा.रावसाहेब दानवेंवर टीका करताना म्हणाले होते, दानवेंचा भाडोत्री बाप दिल्लीत असेल, माझा बाप अस्सल आहे. यावरून हा बापाचा वाद निर्माण झाला होता.
यावर आता दानेवेंनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं आहे. राजकारणात फादर आणि गॉडफादर लागतो, माझा गॉडफादर दिल्लीत आहे.
शिवसेनेने भाजपासोबत युती करून विधानसभेची निवडणूक लढवली आणि युती मोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले, याचा संदर्भ घेऊन रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला टोमणा मारला. तुम्ही चोरून लग्न केलं आणि संसार चालवायला बापाकडे पैसे मागता.
आता आमच्याकडे कशाला पैसे मागता, तुमचं सरकार म्हणजे तुमची जबाबदारी आहे. त्यांनी माझं नाव दसरा मेळाव्यात घेततं. हे आधी दाऊद, हाजी मस्तान यांचा बाप काढायचे.
आता माझा बाप काढला. राजकारणात फादर आणि गॉड फादर लागतो. माझा गॉडफादर दिल्लीत आहे. असं दानवे म्हणाले.
0 Comments