मुंडेंना शिवसेना प्रवेशाची ऑफर; सेना खासदार हेमंत पाटील उद्धव ठाकरेंची भेट घेणार

 
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देण्यात आता पुढील नंबर पंकजा मुंडेंचा असल्याचे बोलले जात आहे. खडसेंप्रमाणे पंकजही भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. 

अशा वेळी पंकजा शिवसेनेत प्रवेश करणारा असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. शिवसेना नेते जाणीवपूर्वक पंकजा मुंडेंना पक्षात घेणार असल्याच्या कयासांना खतपाणी घालत आहेत.

अशातच शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनीही पंकजांना सेना प्रवेशाचे आवताण दिले आहे. हेमंत पाटलांसह शिवसेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांची भेट घेऊन पंकजांना सेनेत बोलवण्यासाठी विनंती करणार आहेत.

Post a Comment

0 Comments