"लोकवार्ता डिजिटल न्यूज पोर्टलचे संपादक अर्जुन गोडगे" कोव्हिडसेवा योध्दा' पुरस्काराने सन्मानित"


सिद्धार्थ वाघमारे/करमाळा:

 २६ नोव्हेंबर २०२० रोजी 'भारतीय संविधान गौरव दिनाचे' औचित्य साधून शेतकरी कामगार संघर्ष समिती, करमाळा यांच्यावतीने कोव्हिड -१९ च्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात कोरोना महामारीला पायबंद घालणाऱ्या कोव्हिड योद्ध्यांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न झाला. यामध्ये तालुक्यातील पोलीस उपाधीक्षक, मा. तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी,वैद्यकीय अधिकारी, पोलीस पाटील संघटना,  आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका संघटना, ग्रामसेवक संघटना, तलाठी संघटना, स्वच्छता कर्मचारी नगरपालिका संघटना व पत्रकार बंधु इत्यादींचा 'कोव्हीड सेवा योद्धा' सन्मानपत्र व संविधाना प्रत देवून गौरव करण्यात आला.
           
(Advertise)

लोकवार्ता डिजिटल न्यूज पोर्टलचे संपादक अर्जुन गोडगे व करमाळा तालुका मुख्य प्रतिनिधी सिद्धार्थ वाघमारे यांना सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोना प्रतिबंधित एरिया मध्ये जाऊन माहिती घेणे व माहिती डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये पोहोचविण्याचे अतुलनीय कार्य निर्भीडपणे केले. देशभर कोरोना योद्ध्यांनी आपली सेवा बजावत मृत्यूला कवटाळले असताना तसेच मृत्यूची भयावह परिस्थिती असतानाही सामाजिक बांधिलकी ,जनतेच्या प्रेमापोटी बातमी कव्हर करण्यासाठी कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन आपले कार्य निष्ठने व प्रामाणिकपणे केले. एवढेच नव्हे तर लेखणीच्या जोरावर कोरोनाबद्दल जनजागृती करण्याचे कार्य मोठ्या हिमतीने केले. एका बाजूला स्वार्थी लोकांचा सुळसुळाट असताना तर दुसर्‍या बाजूला संपादक, अर्जुन गोडगे यांच्यासारखे जातिवंत पत्रकार ज्यांनी या दुःखद काळात निस्वार्थी भावनेने भारतीय लोकशाहीच्या चौथास्तंभ मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन संपादक,अर्जुन गोडगे यांना 'कोव्हिड सेवा योद्धा'पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांच्या या सन्मानाबद्दल करमाळा तालुक्यातील लोकांच्यामध्ये आनंद आहे.
  
(Advertise)

सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तहसीलदार समीर माने यांनी योद्धा हा देशातील प्रत्येक घटक असून आम्ही फक्त आमची जबाबदारी पूर्ण करतो अशा प्रकारचे मत व्यक्त केले त्याचबरोबर व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वीना पवार मॅडमनी फिल्डवर प्रत्यक्षात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचा प्रशंसा करून या कार्यक्रमाच्या आयोजकाचे मनस्वी आभार मानले. 
(Advertise)

दशरथ अण्णा कांबळे यांनी मनोगत मांडताना सांगितले, मी कधीच श्रेय घेण्यासाठी काम करत नाही, परंतु जे व्यक्ति समाजाच्या हिताचे काम करतात. त्यांच्या कामाप्रती त्यांना शाबासकी आणि कौतुकाची थाप दिल्याशिवाय राहत नाही. करमाळ्यातील निष्ठेने काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्ति, अधिकारी, कर्मचारी यांची जर कोणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर अशा नामर्दांना दशरथ (आण्णा) कांबळे यांच्याशी आधी सामोरे जावे लागेल.
        (Advertise)

आण्णांनी काढलेल्या वरील उदगारामुळे उपस्थित सर्व सन्मानित व्यक्तिंमध्ये स्फूरण संचारले. व कार्यक्रम संपल्यानंतर सर्व व्यक्तिंनी सन्मान केल्याबद्दल  आण्णांचे आभार व्यक्त केले.
               
या कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी कामगार संघर्ष समिती, करमाळा अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे, ॲड. महादेव कांबळे,ॲड.अनिल कांबळे, प्रशांत कांबळे,गौतम कांबळे,महाराज कांबळे,सावता कांबळे, आप्पा भोसले, अनिल तेली, अण्णा सुपनवर सुनिल खारे व संविधान प्रेमी कार्यकर्ते यांनी केले. या कार्यक्रम आयोजनाचा  हेतू व  सुनियोजनाबद्दल सर्वत्र समाधानकारक कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments