करमाळा/प्रतिनिधी:
ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक कुटुंबातील विदयार्थीना प्रत्येकी एक मोबाईल हँडसेट ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मनसे करमाळा शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे ईमेल द्वारे केली आहे
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी ऑनलाईन शिक्षण कशाप्रकारे घ्यायचं हा प्रश्न निर्माण झाला असुन प्रत्येक कुटुंबातील तिन चार मुली मुले शिक्षण घेत आहेत परंतु कोरोना आजाराचा संसर्गजन्य रोगामुळे शाळा बंद आहे गेल्या सहा महिन्या पासून लॉकडाऊन असल्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत बिकटची झाली आहे. त्यामध्ये आता ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल हँडसेट घेण्याची परिस्थिती नाही त्या मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहताना दिसत आहे त्यामुळे शासनाने ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल हँडसेट उपलब्ध करून द्यावा व इंटरनेटची सुविधा सुधा मोफत उपलब्ध करुन दयावी. निवेदनाच्या प्रती, शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आले आहे.
अशी मागणी मनसे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे, मनसे विद्यार्थी शहराध्यक्ष सेना सचिन कणसे, यांनी केली आहे. या मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, मनसे तालुका अध्यक्ष संजय बापु घोलप, मनसे करमाळा शहर अध्यक्ष
नानासाहेब मोरे,मनसे विद्यार्थी सेना सोलापुर संपर्क प्रमुख विजय रोकडे, मनसे विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष सतिष भैय्या फंड,मनसे विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष आनंद मोरे, मनसे विद्यार्थी करमाळा शहर शहराध्यक्ष सचिन कणसे,मनसे तालुका उपाध्यक्ष अशोक गोपने हे उपस्थित होते.
0 Comments