बीड जिल्ह्यात पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असून त्याची पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे हे बांधा बांधावर जाऊन पाहणी करत आहेत, त्याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा ही आज उस्मानाबाद, लातूर दौरा सुरू आहे. राज्यावर आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी पुर्ण हवालदिल झाला आहे.
या अनुषंगाने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे. ते म्हणाले की, ‘सध्या विरोधक महाराष्ट्रात कुठे आहेत? ते तर बिहार मध्ये आहेत .जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट येतात तेव्हा तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शरदचंद्र पवार मदतीला धावून येतात. मग ते सत्तेत असो अथवा नसो ‘ असे पालकमंत्री धनंजय मुंडे या वेळी बोलतांना म्हणाले.
0 Comments