महाराष्ट्रात असलेली सत्ता टिकावण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी कृषी कायद्याला विरोध करत असल्याची जोरदार टीका वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांनी केली आहे. सत्तेसाठी काय पण? हेच सूत्र ते अवलंबित असून हे महाराष्ट्रातील जनतेसाठी हानिकारक आहे, असेही त्यानी नमूद केले.
वर्ध्यात खासदार रामदास तडस यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी खासदार रामदास तडस यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका केली. मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचं कृषी विधेयक पारित केलं. त्यामुळं शेतकऱ्यांना त्यांचा कृषी माल देशभरात कुठंही विकता येणार आहे. पण या शेतकरी हिताच्या विधेयकाला विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध चालवला आहे, असं तडस म्हणाले.
0 Comments