सावळेश्वर टोल नाक्यावरील वाढती वाहनांची गर्दी आणि महामार्गावरील इतर समस्यांबाबत आंदोलनाचा इशारा - मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे


मोहोळ/प्रतिनिधी:

सावळेश्वर टोल नाक्यावरील वाढती वाहनांची गर्दी आणि महामार्गावरील इतर समस्यांसंदर्भात माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मोहोळ विश्रामगृहावर मोहोळचे दआमदार यशवंत माने यांनी तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महामार्ग प्रशासनाचे अधिकारी अनिल विपत आणि अविनाश पाटील यांच्यासमवेत बैठक लावून यावर सविस्तर चर्चा केली. या परिसरातील नागरिकांनी महामार्गावरील संदर्भातील समस्या आमदार यशवंत माने यांच्यासमोर मांडल्या.

महामार्ग संदर्भातील सर्विस रस्ते, दिवाबत्ती यासंदर्भातल्या महत्त्वपूर्ण बाबी आमदार यशवंत माने यांनी महामार्ग प्रशासनाच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देऊन याबाबत त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. महामार्ग दुरुस्तीची कामे दर्जेदार करण्याच्या मागणी यावेळी आवर्जून केली..

Post a Comment

0 Comments