खडसे कर्तृत्ववान व धमक असलेला नेता: शरद पवार



भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

याशिवाय राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या खडसेंना पक्षात घेण्याच्या अनुकूल प्रतिक्रियांवरून खडसे भाजप सोडणार असल्याच्या चर्चेला अजून हवा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आज तुळजापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एकनाथ खडसेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “एकनाथ खडसे महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते होते, अर्थमंत्री होते. आम्हाला शिव्या घालत होते, पण त्यांचं कर्तृत्व, काम आणि खानदेशातील स्थान याकडे दुर्लक्ष करता येणार नाही” असे शरद पवार म्हणाले.

Post a Comment

0 Comments