एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी घेतला हा महत्वाचा निर्णय



दिवाळी सणानिमित्त एसटी बसची वाढती मागणी लक्षात घेता, एसटी महामंडळाने ११ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे १ हजार विशेष जादा फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. खास दिवाळी निमित्ताने विशेष गाड्याची सोय केली जाणार आहे.

दिवाळी सणानिमित्त होणारी जादा वाहतूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी, आवश्यक त्या सूचना महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत स्थानिक आगाराला देण्यात आलेल्या आहेत.

या जादा फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बसस्थानकावरून सुटणार असुन, त्या टप्प्याटप्प्याने आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments