भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे आपल्या ग्राहकांसाठी अनेक स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच एका स्वस्त प्रीपेड प्लॅनबाबत सांगणार आहोत, ज्यामध्ये १ जीबी डेटासाठी केवळ ३.५ रुपये खर्च करावे लागतात. सविस्तर जाणून घेऊया या प्लॅनबाबत :
फक्त ३.५ रुपयांमध्ये १GB डेटा :-
रिलायन्स जिओकडे ५९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. ८४ दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज २ जीबी इंटरनेट म्हणजेच एकूण १६८ जीबी डेटा मिळतो. दिवसाची २ जीबी डेटा मर्यादा संपल्यानंतर ६४Kbps च्या कमी इंटरनेट स्पीडने डेटा वापरण्यास मिळतो. म्हणजेच ५९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना केवळ ३.५७ रुपयांमध्ये एक जीबी डेटा वापरण्यास मिळतो.
इंटरनेट डेटाशिवाय जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड जिओ टू जिओ कॉलिंग, नॉन-जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३००० मिनिटे, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन मिळतं. एकप्रकारे जिओचा हा प्लॅन २४९ रुपये आणि ४४४ रुपयांच्या प्लॅनपेक्षाही स्वस्त आहे. कारण ४४४ रुपयांच्या प्लॅनची वैधता ५६ दिवसांची आहे. यात एकूण ११२ जीबी डेटा मिळतो, पण त्यासाठी साधारण १जीबी डेटासाठी ४ रुपये मोजावे लागतात.
एअरटेल, व्होडाफोन-आयडियापेक्षा स्वस्त :-
जिओला टक्कर देणाऱ्या एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाकडेही या सेगमेंटमध्ये शानदार प्लॅन आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाकडे अनुक्रमे ५९८ रुपये आणि ५९९ रुपयांचा प्लॅन आहे. दोन्ही प्लॅनची व्हॅलिडिटीही ८४ दिवस इतकीच आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. म्हणजे एकूण १२६ जीबी डेटा मिळतो. याचाच अर्थ युजर्सना १ जीबी डेटासाठी ४.७५ रुपये खर्च करावे लागतात. म्हणजेच डेटा वापरण्यासाठी जिओच्या प्लॅनच्या तुलनेत एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या युजर्सना जास्त पैसे खर्च करावे लागतात.
0 Comments