कंगनाचं पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य;मुंबईला POK नव्हे तर सीरिया म्हणायला हवं होतं...


बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावत तिच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर धमकावल्याचा आरोप करताना कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. आता कंगनाने नुकाताच दिलेल्या मुलाखतीमध्ये मुंबईची तुलना काश्मीरशी करण्यावर वक्तव्य केले आहे.

नुकतीच कंगनाने ‘टाइम्स नाऊ’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने, ‘मला हरामखोर म्हटले गेले. त्यामुळे मला हे मुंबईसारखे वाटले नाही. हे सर्व पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे वाटले. नंतर त्यांनी याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.

पुढे ती म्हणाली, ‘मी पीओके म्हणाले पण मला सीरिया म्हणायला हवे होते. कारण जेव्हा राहूल गांधी म्हणतात त्यांना भारत सीरियासारखा वाटतो तेव्हा कोणीही त्यांना त्रास देत नाही आणि त्यांचे घर तोडत नाही. या लोकांची नेमकी समस्या काय आहे?’ कंगना काही दिवसांपूर्वीच मुंबईतून मनालीत तिच्या घरी परतली आहे. पण ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.


 

Post a Comment

0 Comments