गर्लफ्रेंडवर गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्यानं तिला रस्त्यात दिले फेकून....


एका पोलीस अधिकाऱ्यानं गर्लफ्रेंडवर गोळी झाडून तिला रस्त्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर घटना दिल्लीच्या अलीपूर भागात ही धक्कादायक घडल्याचे वृत्त आयएएनएसने दिले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती आता स्थिर असल्या माहिती देण्यात आली.
__________________________________________
📢
(Advertise)
__________________________________________

जखमी महिला आणपोलीस अधिकारी दोघेही परस्परांना ओळखतात. वर्षभरापासून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते असे सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यातील जखमी महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप दाहिया यांनी आपल्यावर गोळी झाडली असल्याचे तिने सांगितले. संदीप दाहिया यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments