बहुजन पार्टी कडून माळशिरस तहसिलवर एकदिवसीय धरणे आंदोलन संपन्न


माळशिरस/प्रतिनिधी;

माळशिरस तहसील येथे बचत गट ,मायक्रो फायनान्स, व विविध प्रकारच्या फायनान्स यांची कर्ज माफी व्हावी म्हणुन बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने  बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुलजी मखरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व काकासाहेब जाधव ,लोकनेते विकासदादा धाइंजे यांच्या मार्गदर्शनाखाली आज एकदिवसीय धरणे आंदोलन झाले.
आजच्या धरणे आंदोलनाला माळशिरस तालुक्यातील महिलांनी तालुक्यातील विवीध सामाजीक संघटनांनी या धरणे आंदोलनला समर्थन दिले.माळशिरस तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व जेष्ठ नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली होती.आजच्या आंदोलनाला बहुजन पार्टी च्या कार्यकर्त्यांनी यशस्वी केले.

Post a Comment

0 Comments