मराठा आरक्षणाविषयी शरद पवार यांचे दिलासादायक वक्तव्य...


मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगित मिळाल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून उठला. अनेक जिल्ह्यांसह विविध भागात कार्यकर्त्यांनी न्याय मिळण्यासाठी आंदोलनाला हाक दिली, तर विरोधी पक्षाकडून मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरत महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

मराठा समाजाचे आरक्षण कायम राहावे, यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. सर्वपक्षीय बैठका, मराठा संघटना आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज करण्यात आला आहे. त्यावर सरन्यायाधीश निर्णय घेतील, असे ‘वर्षा’ निवासस्थानी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ठरले.

मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे देण्यात आलेल्या सवलतींवर कोणता परिणाम झाला आहे. त्यावर विविध विभागांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच देणार आहेत, असे सांगत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाला शांततेचे आवाहन केले. दरम्यान, ‘वर्षा’वर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यात आक्रमक होत असलेल्या मराठा आंदोलनाचा आढावा घेतला.

मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली. मराठा आरक्षणाबाबत काही कायदेशीर मुद्दे आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाली होती. त्याची माहिती शरद पवारांना दिली, असे चव्हाण यांनी या भेटीबाबत सांगितले.

Post a Comment

0 Comments