चार गावांचा पाणी प्रश्न मिटला; म्हसेवाडी तलावातील पाण्याचे पूजन


करमाळा/प्रतिनिधी;

 पांडे, म्हसेवाडी, अर्जुन्नगर , शेलगाव इत्यादी गावातील पाणीपुरवठा योजना अवलंबून असल्याकारणाने या तलावाला दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आ.संजयमामा शिंदे यांचे सूचनेनुसार प्राधान्याने पाणी देण्यात आले. म्हसेवाडी तलावातील पाण्याचे पूजन करण्यात आले, उपयुक्त पातळीपर्यंत हा तलाव भरल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ समाधान व्यक्त करत असून आ. संजयमामा शिंदे यांचे आभार मानत आहेत.

म्हसेवाडी तलावामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्याबद्दल कमलाई शुगर कारखान्याचे चेअरमन तथा पंचायत समितीचे सभापती श्री विक्रमसिंह दादा शिंदे यांच्या हस्ते या तलावातील पाण्याचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अर्जुननगरचे युवक नेते समाधान भोगे, म्हसेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब अडसूळ, ज्ञानेश्वर ननवरे, रामा बिचकुले, पांडे चे युवक नेते नानासाहेब अनारसे, सरपंच तुकाराम क्षीरसागर , अभिजित दुधे गुरुजी, ज्ञानदेव क्षीरसागर , नवनाथ विटकर , पत्रकार दस्तगीर मुजावर , सम्मद मुजावर , प्रगतशील शेतकरी त्रिंबक ननवरे आदिंसह पांडे, म्हसेवाडी, अर्जुननगर येथील शेतकरी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments