मुंबई : कोरोना व्हायरसमुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशी माहिती वरिष्ठ शैक्षणिक आधिकारी यांनी दिली. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
पुढे ढकलण्यात आलेल्या या परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यावेळी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन दहावी-बारावीच्या एटीकेटीच्या परीक्षांचा निर्णय घेण्यात येणार आहे.
दहावी बारावी च्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा घेऊन उत्तीर्ण होण्याची संधी गेल्या काही वर्षापासून दिली जात आहे.
0 Comments