सर्वोच्च न्यायालयाने पाळीव प्राणी शर्यतीवर बंदी असतानाही सांगोल तालुक्यातील कोळा येथे पाळीव कुत्र्याच्या शर्यतेची आयोजन करण्यात आले होते. आयोजकाना शर्यत चांगलीच महागात पडली आहे. सांगोला पोलिस स्टेशनमध्ये १७ जणाविरोधत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली. यात चार दुचाकी व एक चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेला महितीनुसार, प्राण्यांच्या शर्यती भरवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असताना तसेच सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश असतानाही कोळा (ता. सांगोला) हद्दीतील फॉरेस्टमधील मोकळ्या जागेत १० सप्टेंबर रोजी दुपारी पै.लक्ष्मण कंराडे, सागर भाऊ करांडे, अजित शेदाळ यांनी कुत्र्यांच्या शर्यतीचे आयोजन केले होते.
या प्रकरणी पै. लक्ष्मण करांडे, समा जुनोनी, सागर करांडे, अजित शेवाळे, गणेश अशोक मोरे व उदय अरुण माने रा. दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, प्रतीक देवेंद्र मरडे रा. अंकली, ता. मिरज, ओंकार संजय भोसले रा. आळते, ता. हातकणंगले, धनाजी जगन्नाथ पाटील व बजरंग तुळशीराम माने रा. घाणंद, अनिल दल्याप्पा निळे व संजय मनोहर चौगुले रा. जालिहाळ, ता. मंगळवेढा, सुनील पोपट चव्हाण व काशिलिंग हिंदुराव मंडले रा. एखतपूर, ता. सांगोला बाळासाहेब सोपान खांडेकर कोळा, दत्तात्रय बाळासाहेब वाघमोडे रा. सावे व सदाशिव मधुकर बिचुकले रा. बामणी अशी त्यांची नावे आहेत. याबाबत पोकाॅ सुमित पिसे यांनी फिर्याद दाखल केली असून. सांगोला पोलिसांनी भा.दं.वी. क्र १८८, २७०, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब), महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम ३७(३)/१३५ साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम १८७९ चे कलम २,३,४ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६९ चे कलम ११(१)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी करीत आहेत.
0 Comments