पंढरपुरात लोककलावंतांचे अनोखे आंदोलन करत सरकारला घातली साद


पंढरपूर/प्रतिनिधी;

राज्यात आणि देशातील गावागावात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीमुळे कलावंतांची उपासमार सुरु आहे.अशा परिस्थितीत शासकीय नियमांचे पालन करुन राज्यातील कलावंतांना कार्यक्रम करण्यास परवानगी मिळावी, सध्या कलाकारांचे कार्यक्रम बंद असल्यामुळे हे सर्व जण आर्थिक अडचणीत आले यांच्यासह अनेक लोककलाकारांनी त्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपआपल्या कला सादर करुन  तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. 

शहर व तालुक्‍यातील लोक कलाकार, बॅन्ड पार्टी कलाकारांनी आपआपल्या कलांचे सादरीकरण करुन परिसर दणाणून सोडला. लोककलावंतांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा निर्धार गणेश गोडबोले यांनी याप्रसंगी व्यक्त केला. उद्धवा अजब तुझे सरकार... असे म्हणत एकतारी भजनी कलाकार, शाहीर, वाघ्यामुरळी कलवंतानी कला सादर करत आनोखो आंदोलन केले.

स्वरांजली ग्रुपचे संस्थापक, कलाकार गणेश गोडबोले यांनी लोककलावंताच्या मागण्यांसाठी आजपासून तहसील कचेरीसमोर सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बॅन्डवाले, गायक, वादक, मंडप व्यावसायिकांसह अनेक जणांनी हजेरी लावली. उपोषणाला पाठींबा देण्यासाठी भारुडकार चंदाताई तिवाडी, प्रसिध्द गायक दिलीप टोमके यांच्यासह महाराष्ट्र राज्य वाघ्यामुरळी परिषदेचे शाहीर सुभाष गोरे, सुयोग कलामंचचे रविंद्र शेवडे, अखिल भारतीय शाहीर परिषदेचे विजयकुमार व्यवहारे, परशुराम पवार, शाहीर नंदकुमार पाटोळे, विनय महाराज बडवे, अरुण जोशी, वैभव जोशी, साउंड मंडप असोसिएशनचे अध्यक्ष भगवानराव मनमाडकर, डॉ. प्राजक्ता बेणारे, नाट्य परिषदेचे राजभाऊ उराडे, बाळासाहेब गोडबोले, पार्थ बेणारे आदी उपोषणस्थळी आले होते.

Post a Comment

0 Comments