लखनऊः आग्र्यामध्ये मुघल संग्रहालयाचे बांधकाम सुरू आहे. पण या संग्रहालयाचे नाव बदलण्यात येत असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलंय. आग्रामधील संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव देण्यात आले आहे, अशी घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली.
उत्तर प्रदेश सरकार हे स्वराज्याच्या विचारांनी प्रेरीत आहे. गुलामीच्या मानसिकतेचे प्रतीक असलेली चिन्ह सोडून देशाचा गौरव वाढवणाऱ्या विषयांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आपले नायक मुघल असू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले नायक आहेत, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
सीएम योगी यांनी यूपी सरकारच्या पर्यटन विभागाला याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.आग्रामध्ये बांधल्या जाणाऱ्या या संग्रहालयात मुघल वस्तू आणि कागदपत्रे प्रदर्शनासाठी मांडण्यात येतील. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी संबंधित गोष्टीही या संग्रहालयाचा भाग असतील, असं उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
0 Comments