राज्यात कोरोनाचा कहर, गेल्या २४ तासातील धक्कादायक आकडेवारी


मुंबई ; राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसतात. राज्य सरकारकडून कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान राज्यात २२,५४३ नवीन रुग्णांचे निदान झालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात २२,५४३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १०,६०,३०८ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण २,९०,३४४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज ११,५४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७,४०,०६१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण  ६९.८ % एवढं झालं आहे.

राज्यात आज ४१६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.७९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५२,५३,६७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १०,६०,३०८ (२०.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,८३,७७० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,२९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.



 

Post a Comment

0 Comments