आजरात मुसळधार पाऊस; आझाद कॉलनीला जलाशयाचं स्वरुप


राकेश करमळकर/आजरा;
        
 दि.०९; रोजी दुपारी तीन वाजता आजरा येथे मुसळधार पावसाची बरसात झाली. आजरा शहरामधील आझाद नगर या सखल भागात असलेल्या वस्तीमध्ये जोरदार झालेल्या पावसाचे पाणी घुसल्यामुळे सर्व रस्ते जलमय झाले होते तर काही घरात तुरळक प्रमाणात पाणी घुसले पण यामुळे कोणत्या प्रकारचे नुकसान झाले नाही असे समजते. 

या भागातील गटार निमुळत्या आहेत. त्यामध्ये मुसळधार पावसामुळे कचरा साचल्याने येथे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.  नगरपंचायतीने तेथील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments