सुर्डी/प्रतिनिधी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत ग्रामीण कृषी कृषि जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम जुलै 2020 पासून विविध गावात राबावला जात आहे.
कृषी महाविद्यालय कराड येथील विद्यार्थी अभिनंदन भारत दगडे याने सुर्डी गावातील शेतकऱ्यांना जनावरांचे लसिकरण,माती परीक्षण तसेच शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध घटकांवर मार्गदर्शन केले.तसेच कृषीदूताने त्यावरती प्रात्यक्षिक सादर करून दाखवले.असा उपयुक्त कार्यक्रम गावामधे राबावल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषीदूताचे कौतुक केले.
या कार्यक्रमसाठी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थाना महाविद्याल्याचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.आर.आर.सूर्यवंशी,कार्यक्रम अधिकारी आर.एच.हंकारे,एस.एस.कोळपे आणि कार्यक्रम समन्वयक डॉ.डी.एस.नावडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments