बार्शी तहसीलवर राज्यातील सत्ताधारी शिवसेनेचे मोर्चा


बार्शी/प्रतिनिधी ; फायनान्सचे कर्ज आम्ही भरणार नाही,  वीज बिल कमी करा, रेशनचा तांदूळ परत द्या, जनावरांचा बाजार सुरु करा,शेतकऱ्यांप्रमाणे महिलांचे बचत गटाचे कर्ज माफ करावे, महिलांना कर्जमुक्त करा अशा घोषणा देत शेकडो महिलांनी येथील तहसील कार्यालयावर बुधवारी भर उन्हामध्ये मोर्चा काढला. 

शासनाने दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलनाचा यावेळी इशारा देण्यात आला. दरम्यान, राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेनेच तहसील कार्यालयावर मोर्चा काढल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, दीपक आंधळकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. 
(जाहिरात..... वाढदिवस विशेष)

 यावेळी बोलताना, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर म्हणाले, की कोरोना संसर्गामुळे देश लॉकडाउन झाला. मागील पाच महिने झाले, अनेकांचे रोजगार गेले, दोन वेळचे अन्न मिळण्याची भ्रांत आहे. अशा परिस्थीत खासगी फायनान्स कंपन्या नागरिकांना त्रास देत आहेत. 

शहरातील महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरावेत म्हणून फायनान्स कंपन्यांचे एजंट वसुलीचा तगादा लावत आहेत. सामान्य, गोरगरीब जनतेच्या तोंडातील रेशनचा तांदूळ पनवेल येथे काळ्या बाजारात विक्री केला जातो. तो तांदूळ परत बार्शीतील कुटुंबाना शासनाने द्यावा. मुबंईची तुलना पाकिस्तानबरोबर करणाऱ्या, राज्याला कमी लेखणाऱ्या कंगना राणावतवर गुन्हा दाखल करावा, असे निवेदनात स्पष्ट केले असल्याचे आंधळकर यांनी सांगितले. यावेळी प्रहार संघटनेच्या संजिवनी बारंगुळे, संगीता पवार, ऍड .राजश्री डमरे, आप्पा पवार, दीपक आंधळकर, सुनिता जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारुन भावना शासनाकडे कळवण्यात येथील असे आश्वासन दिले. 

Post a Comment

0 Comments